जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी : मुरलीधर जाधव

0
156

कुंभोज (प्रतिनिधी) : गेले दोन दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. मात्र, तमाम शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सामर्थ्यशाली नेतृत्त्वाखाली यातूनही शिवसेना फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारेल. त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील आम्ही सर्व शिवसैनिक हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी व उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी सांगितले.

इचलकरंजी येथील मलाबादे चौकात शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे जो आदेश देतील तो आदेश आणि घेतील तो निर्णय आम्हां शिवसैनिकांसाठी शिरसावंद्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख महादेव गौड, मधुकर पाटील, साताप्पा भवान, तालुकाप्रमुख वैभव उगळे, बाजीराव पाटील, शहरप्रमुख सयाजी चव्हाण, महिला आघाडी जिल्हा संघटिका मंगल चव्हाण, आण्णासो बिलोरे, संदिप पाटील, बाबासाहेब सावगावे, अमोल देशपांडे आदी उपस्थित होते.