कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त रविवारी (दि. १५) महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार आहेत. तरी कोल्हापूर शहरातील सर्व मटण, मांस व चिकन विक्रेत्यांनी यांची नोंद घेवून दुकाने बंद ठेवावीत. यामध्ये कोणत्याही प्रकारची कसूर झाल्यास संबंधित दुकान मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेच्यावतीने देण्यात आला आहे.