टोप (प्रतिनिधी) : नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासकीय उपक्रमास सर्वानी प्रतिसाद देत कोरोना लस घ्यावी. जेणेकरुन तुमच्या शरिरामध्ये प्रतिकारशक्ती वाढून तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल, असे आवाहन हातकणंगले पंचायत समितीचे सभापती डॉ. प्रदीप पाटील यांनी केले. टोप येथे पाटील यांच्या हस्ते लसीकरणास सुरूवात करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. 

सरपंच रुपाली तावडे म्हणाल्या की, सर्व ग्रामस्थांनी लस घेऊन कोरोनावर मात करावी. कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता लस घ्यावी. लसीपासून कोणताही त्रास होत नाही. 

यावेळी डॉ. प्रीती दातीर, अनुराग बारसिंग, ग्रामविकास अधिकारी डी.आर. देवकाते, कासारवाडीचे ग्रामसेवक प्रभाकर परिट, संभापूरचे सरपंच प्रकाश झिरंगे, कासारवाडी सरपंच शोभाताई खोत, संग्राम लोहार, विठ्ठल पाटील, महादेव सुतार, विश्वास कुरणे, विजय पाटील, रंजना पाटील, अंजना सुतार, आरोग्य सेवक एस. आर. कांबळे आदी  उपस्थित होते.