इचलकरंजीतील कामगार रुग्णालयात सर्व मुलभूत सुविधा पुरवणार : उदयसिंग पाटील

0
66

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथील राज्य कामगार विमा योजना सेवा रुग्णालयात आवश्यक त्या मुलभूत सोयी सुविधा तात्काळ पुरवण्यासाठी कार्यवाही केली जाईल. अशी ग्वाही नगरपालिकेचे बांधकाम समिती सभापती उदयसिंग पाटील यांनी आज (गुरुवार) दिली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य,नगरसेवक मदन कारंडे यांच्यासहीत या रुग्णालयाला पाटील यांनी भेट दिली.

उदयसिंग पाटील म्हणाले की, इचलकरंजी शहर परिसरातील कामगारांच्या आरोग्यासाठी अत्यंत सोयीचे हे रुग्णालय आहे. या रुग्णालयात रुग्ण आणि नातेवाईकांना बसण्यासाठी दोन हॉल, पाण्याच्या साठवणूकीसाठी व्यवस्था करणे, शौचालय आणि बाथरूम बांधणे, वीज पुरवठ्यासाठी नवीन वायरींग करणे, अशा मुलभूत सोयी सुविधा तात्काळ पूर्ण करण्याची कार्यवाही केली जाईल. अशी ग्वाही पाटील यांनी दिली.

यावेळी नगर अभियंता संजय बागडे, इस्टेट विभाग प्रमुख सी.डी.पवार, इंजिनिअर बेले, नगरसेवक मंगेश कांबुरे, प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. जावडेकर, धोंडीबा कुंभार, अमित वरुटे, आनंद कांबळे, रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.