बाबरी मशीद प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष : विशेष न्यायालय

लखनऊ (वृत्तसंस्था) : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात तब्बल २८ वर्षानंतर विशेष न्यायालयात आज (बुधवार) निर्णय सुनावला. यावेळी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निकाल देण्यात आला.

६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर फैजाबादमध्ये दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या. यातील एक एफआयआर लाखो कारसेवकांविरोधात दाखल करण्यात आली होती, तर दुसरी एफआयआर संघाच्या कार्यकर्त्यांसहीत लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा जोशी, शिवसेना नेते स्वर्गीय बाळ ठाकरे यांच्याविरोधात दाखल करण्यात आली होती.

Live Marathi News

Recent Posts

कोल्हापूर कोरोना अपडेट : ५९ जणांना डिस्चार्ज

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल…

47 mins ago