Published September 25, 2020

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी केडीसीसी बँकेने काढलेले टेंडर आज नामंजूर करण्यात आले. बॅंकेचे ज्येष्ठ संचालक पी.जी. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

  

याबाबत अधिक माहिती अशी, थकीत कर्जबाकी पोटी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना सरफेसी कायद्याअंतर्गत ताब्यात घेतला आहे. तो भाडे तत्त्वावर चालविण्यासाठीचे टेंडर बँकेने काढले होते. या टेंडरला प्रतिसाद देत केवळ एका पार्टीने निविदा दाखल केली. पुण्यातील विजन इंडिया सेवन ट्रेडर्स कंपनीच्यावतीने प्रोप्रा यशवंत दत्तात्रय देसाई यांनी टेडर फॉर्म भरलेला होता.

मात्र, या टेंडरसोबत बयाना रकमेपोटी दिलेला डीडी वटला नाही. तसेच सदर टेंडरधारक यांची आर्थिक सक्षमता बँकेच्या पॅनेलवरील चार्टर्ड अकाउंटंट तपासली असता सदरची फार्म आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे आढळून आले. त्यामुळे या फर्मचे टेंडर नामंजूर करण्यात आले. त्यामुळे या कारखान्याबाबतचे पुढील कार्यवाहीचे धोरण बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व कारखाना संचालक मंडळांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवण्याचे बैठकीत ठरले.

बैठकीला राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार पी एन पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार राजूबाबा आवळे, प्रताप उर्फ भैय्या माने, संतोष पाटील, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, असिफ फरास,  विलासराव गाताडे, अनिल पाटील, सर्जेराव पाटील- पेरीडकर, आर.के. पवार, उदरयानीदेवी साळुंखे आदी उपस्थित होते.

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023