आजरा कारखान्याची एफआरपीची रक्कम ऊस उत्पादकांच्या खात्यात जमा : सुनिल शिंत्रे

0
676

आजरा (प्रतिनिधी) : आजरा सहकारी साखर कारखान्याकडून सन २०१८-१९ मधील ३ लाख १३ हजार ऊस बिलाची देय रक्कम २ कोटी ६० लाख २३ हजार ६६९ इतकी रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा केल्याची माहिती चेअरमन प्रा. सुनील शिंत्रे यांनी दिली.

शिंत्रे म्हणाले की, कारखान्याने सन २०२१-२२ साठी ४ लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील आणि बाहेरील अशा ८ हजार ७०० हेक्टर ऊसाची नोंद कारखान्याकडे झाली आहे. कारखाना मशिनरी ओव्हर ऑयलिंगचे काम पूर्ण झाले असून कारखाना ऊस गाळपासाठी सज्ज आहे. २५ ऑक्टोबरला मोळी पूजनाचा कार्यक्रम असून याच दिवशी गाळपास सुरवात होणार आहे. तसेच यावर्षीच्या देय ऊसबिलाच्या रक्कमेची तजवीज कारखाना आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातुन केली आहे.

तरी ऊस उत्पादकांनी आपला ऊस कारखान्याडे पाठवून सहकार्य करावे असे अवाहन शिंत्रे यांनी केले. यावेळी व्हा.चेअरमन आनंद कुलकर्णी, कार्यकारी संचालक तानाजी भोसले, सर्व संचालक, खातेप्रमुख, उपस्थित होते.