विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर अजित पवारांचे ‘मोठे’ विधान

0
76

पुणे (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोरेगाव भीमा मधील विजय स्तंभाला आज (गुरूवार)  सकाळी अभिवादन केले. कोरेगाव भीमा परिसराचा विकास आराखडा मंजूर करून द्या. त्यास कोणतीही अडचण येऊन देणार नाही, अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली. 

अजित पवार म्हणाले की, या स्तंभाच्या आसपासची जागा ताब्यात घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. या जागा खासगी मालकीच्या असल्याने जागा मालकांना योग्य तो मोबदला देऊन जागा ताब्यात घेण्यात येतील. पालकमंत्री  आणि अर्थमंत्रीदेखील मीच असल्याने या विकास आरखड्यासाठी आर्थिक बाजू देखील योग्यप्रकारे सांभाळली जाईल. त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नसल्याची ग्वाही देतो, असेही पवार म्हणाले. कोरोनामुळे सर्वांनी आपापल्या घरातूनच विजयस्तंभाला व शूरवीरांना अभिवादन करावे. प्रशासनाने केलेल्या सूचना व नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.