एसटी संपाबाबत अजित पवार, अनिल परब, शरद पवार यांच्यामध्ये खलबते

0
60

मुंबई (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये आज (सोमवार) नेहरू सेंटर येथे महत्त्वाची बैठक होत आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून संपावर तोडगा निघणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.  

एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाची मागणी लावून धरल्याने संपाची तीव्रता वाढली आहे. अद्यापही यावर तोडगा काढण्यात यश आलेले नाही. राज्य सरकारने वेतनवाढीसह इतर मागण्यांबाबत सकारात्मकता दाखवली आहे. परंतु कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. तर संपाला भाजपने पूर्ण पाठिंबा दिला असून भाजप नेते सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर आझाद मैदानावर तळ ठोकून आहेत. त्यामुळे सरकार आणि विरोधकांमध्ये आरोपप्रत्यारोप सुरू आहेत.