अजित डोवाल दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर..!

0
130

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  जैश ए मोहम्मदच्या अटक केलेल्या एका दहशतवाद्याने पाकिस्तानी हॅन्डलरच्या सांगण्यावरून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या कार्यालयाची रेकी केली आहे. त्यामुळे  डोवाल यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. 

काश्मीरच्या शोपियाँचा रहिवासी असलेल्या  ‘जैश’चा दहशतवादी हिदायत उल्लाह मलिक याच्याजवळ डोवाल यांच्या कार्यालयाच्या रेकीचा एक व्हिडिओ आढळला होता. मलिक याला ६ फेब्रुवारीरोजी अटक करण्यात आली होती.  त्यानंतर त्यांने गेल्या वर्षी ही रेकी केल्याची कबुली दिली होती. डोवाल यांच्या कार्यालयाशिवाय श्रीनगरमधील इतरही काही भागांचे व्हिडिओ चित्रीकरण मलिककडे आढळून आले होते. हे व्हिडिओ त्याने पाकिस्तानमध्ये पाठवून दिले होते.  या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.