हातकणंगले (प्रतिनिधी) : राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी आज (शुक्रवार) सकाळी हातकणंगले येथे लक्ष्मी इंडस्ट्रिअल इस्टेटमधील लँडक्राफ्ट अॅग्रो प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत खा. धैर्यशील माने, जिल्हा कृषी अधिकारी उमेश पाटील, ज्ञानदेव वाखुरे, उपविभागीय कृषी अधिकारी मकरंद कुलकर्णी यांच्यासह तालुक्यातील  शेतकरी, राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी शिवसेनेचे माजी आ. सुजित मिणचेकर यांच्या कार्यालयात भेट देऊन चर्चा केली. कोरोनाच्या पार्श्भूमीवर मंत्री भुसे यांनी आपला दौरा १५ मिनिटात आटोपला. यावेळी शेतकऱ्यांनी भुसे यांना आपल्या व्यथा मांडून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आम्हाला शेती करणे अवघड झाली असून सरकारकडून मिळणारे अनुदान वेळेत मिळत नसल्याच्या आदी मागण्या केल्या.