मुंबई (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर भारताचा माजी कर्णधार कॅप्टन कूल एमएस धोनीने नव्या व्यवसायात पर्दापण करण्याचा निर्णय  घेतला आहे. धोनी कडकनाथ कोंबड्यांची विक्री करणार असून  मध्य प्रदेशातील झाबुआच्या कडकनाथच्या २ हजार पिल्लांसाठी झाबुआच्या आदिवासी शेतकऱ्याला ऑर्डर दिली आहे.

तीन महिन्यांपूर्वी धोनीचे शेती सांभाळणारे मॅनेजर कृषी विकास केंद्र आणि एमपी केदारनाथ मोबाईल ऍप द्वारे संपर्कात आले. पाच दिवसांपूर्वी त्यांनी २ हजार कडकनाथ कोंबड्यांची ऑर्डर केली.

दरम्यान,  २०१९ मध्ये धोनी सेंद्रीय शेतीकडे वळला आहे. धोनीचे ४३ एकर शेतीत शेती करतानाचे फोटो देखील व्हायरल झाले होते. त्याचप्रमाणे धोनीने सहीवाल जातीच्या गाई विकत घेतल्या आहेत. तसेच मत्सोद्योगात, बदक पालन आणि पोल्ट्री फार्ममध्ये देखील धोनीने गुंतवणूक केली आहे.