पुण्यानंतर मनसेचा मुंबईतील ‘अ‍ॅमेझॉन’च्या कार्यालयात खळ्‌खट्याक..! 

0
96

मुंबई (प्रतिनिधी) : मनसे कार्यकर्त्यांनी पुण्यानंतर मुंबईतील अ‍ॅमेझॉनची कार्यालये  फोडली आहेत. चांदिवली येथील अ‍ॅमेझॉनच्या दोन कार्यालयाची आज (शुक्रवार) दुपारी तोडफोड करण्यात आली आहे. याआधी पुण्यातील कोंढवा भागातील ॲमेझोनच्या कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती.  

मनसेच्या मराठी भाषेच्या मोहिमेविरोधात अ‍ॅमेझॉनने न्यायालयात तक्रार केली होती. त्यानंतर दिंडोशी कोर्टाने राज ठाकरे यांना नोटीस पाठवून ५ जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. याचे मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत ॲमेझोनला आव्हान दिले आहे.