मनसुख हिरेननंतर त्याचठिकाणी आणखी एक मृतदेह सापडला

0
187

मुंबई (प्रतिनिधी) : मुंब्रा रेतीबंदर जिथे मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला होता. तिथेच अजून एक मृतदेह आज (शनिवार) सकाळी ११ वाजता सापडला आहे.  त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतला आहे.  शेख सलीम अब्दुल (वय ४८) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शेख अब्दुल सलीम मजूर असून मुंब्रा, रेतींबदर येथे राहत होते.

दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला होता. त्याच ठिकाणी आणखी एक मृतदेह सापडल्याने  या प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता  आहे.