एकनाथ खडसेंनंतर आणखी एका भाजप नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

0
67

मुंबई (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले. हा धक्का भाजपसाठी ताजा असताना आता बीड जिल्ह्यातील भाजपचे माजी खासदार  जयसिंग गायकवाड यांनी आज (मंगळवार) राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील पक्ष कार्यालयात त्यांचा प्रवेश झाला.

काही दिवसापूर्वी जयसिंग गायकवाड यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. अखेर आज त्यांनी राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश केला आहे. गायकवाड तीन वेळा बीडचे खासदार म्हणून निवडून  आले आहेत. तर पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा आमदार झाले आहेत.

मानसन्मान मिळत नाही त्या पक्षात राहू शकत नाही. भाजपमध्ये चांगल्या कार्यकर्त्यांचा वाळवंट केला जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे काय हाल सुरू आहेत, हे सर्वांना माहीत आहे. काही खुंकार लोकांनी भाजपचा ताबा घेतल्याची खरमरीत टीका गायकवाड यांनी यावेळी केली.