मुंबई (प्रतिनिधी) : धोनीच्या रिटायरमेंट नंतर त्याच्या मैदानावरील आठवणींची अजूनही क्रिकेट विश्वात चर्चा होत असतानाच भारताचा विकेट किपर बॅट्समन पार्थिव पटेलने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून रिटायरमेंट जाहीर केली आहे. पार्थिवने वयाच्या १७ व्या वर्षी २००२ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१८  शेवटची टेस्ट खेळला होता. पार्थिव पटेल आयपीलमधील मुंबई इंडियन्स टीममध्येही खेळला होता.

पार्थिव पटेलने यावेळी लिहिलेल्या पत्रात बीसीसीआय तसेच तो ज्या टीममध्ये सहभागी झाला त्या टीमचे सर्व कॅप्टनचे आभार मानले आहेत. पार्थिव आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमचा सदस्य होता. मात्र या आयपीएलमध्ये त्याला एकही मॅच खेळता आली नाही. पार्थिवच्या नेतृत्वाखालीच गुजरातच्या टीमने रणजी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक विजेतेपद पटकावले होते.