मुंबई  (प्रतिनिधी) : कोविड लस टोचून घेताना काहीच कळत नाही. या लशीबाबत कोणत्याही प्रकारची भीती किंवा मनात संभ्रम बाळगण्याचे कारण नाही, असे सांगून राज्यात कोरोनाचा  धोका वाढत  आहेत. त्यामुळे लसीकरणासाठी पात्र  असलेल्या नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (गुरूवार)  केले.

मुख्यमंत्री ठाकरे  यांनी मुंबईतील जे. जे. रुग्णालयामध्ये आज दुपारी साडेबाराच्या सुमारास लस घेतली.  यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.  यावेळी मिलिंद नार्वेकर यांनीदेखील लस घेतली.

कोरोना लसीसंदर्भात नागरिकांमध्ये असलेला संभ्रम दूर होण्याच्या  हेतूने मुख्यमंत्र्यांनी  कोरोनाची लस घेतल्याचे सांगितले जात आहे. ही लस घेत सर्वांनीच लसीकरणाच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हावे, असा संदेशच मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोव्हॅक्सिन लस घेतल्याचे डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.