नवी दिल्ली (वृत्तसंस्था): श्रद्धा खून प्रकरणातील आरोपी आफताबला मंगळवारी पुन्हा रोहिणी एफएसएलमध्ये पॉलीग्राफ चाचणीसाठी आणण्यात आले आहे. सोमवारी येथे झालेल्या हल्ल्यानंतर प्रयोगशाळेबाहेर बीएसएफ तैनात करण्यात आले आहेत. हल्ल्यातील दोन आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

आफताबला एफएसएलमध्ये नेण्याचा रोडमॅपही तुरुंग प्रशासनाने तयार केला आहे. तिहारमध्येही आफताबची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आफताबची पॉलीग्राफ चाचणी सकाळी ११ वाजता सुरू झाली आहे. सोमवारी त्याची सुमारे ८ तास चौकशी करण्यात आली. ती पूर्ण झाल्यानंतर ५ डिसेंबर रोजी नार्को चाचणी होण्याची शक्यता आहे.

आफताबची नार्को टेस्ट ५ डिसेंबरला होऊ शकते. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचे संचालक नवनीत गोयल यांनी सांगितले की, त्यांना अद्याप एफएसएलकडून नार्को चाचणीसाठी कोणतीही विनंती प्राप्त झालेली नाही. वैद्यकीय फिटनेस प्रक्रिया निश्चितपणे केली गेली आहे. आम्ही पुढील सोमवारपर्यंत एफएसएलकडून रिक्वेस्ट येईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.

श्रद्धा खून प्रकरणातील आरोपी आफताबला घेऊन जाणाऱ्या व्हॅनवर ४-५ जणांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. पॉलीग्राफ चाचणीनंतर त्याला फॉरेन्सिक सायन्स लॅबमधून नेले जात असतानाच या व्यक्तींनी व्हॅनचा पाठलाग केला. यातील दोन जणांच्या हातात तलवारी होत्या. एका हल्लेखोराने सांगितले की १५ लोक गुरुग्राममधून आले होते आणि सकाळी ११ वाजल्यापासून एफएसएलच्या बाहेर बसले होते. या लोकांनी कारमध्ये अनेक तलवारी आणि हातोडे आणले होते. आमची बहीण आणि मुलीचे ३५ तुकडे करणार्‍या आफताबचे ७० तुकडे करायला आम्ही आलो होतो, असे हल्लेखोराचे म्हणणे आहे.