काबूल (वृत्तसंस्था) :  तालिबानपासून वाचण्यासाठी काबुल विमानतळाबाहेर शेकडो अफगाणिस्तान नागरिक देश सोडण्याची वाट पाहत आहेत. मात्र, इथे पोहलचलेले हे लोक उपासमारीने त्रस्त झाले आहेत. विमानतळाबाहेर खाण्या-पिण्याच्या वस्तू जास्त किंमतीत विकल्या जात आहेत. तर दुकानदार अफगाणिस्तानमधील चलनाऐवजी डॉलरची मागणी करीत आहेत. अमेरिका आणि ब्रिटीश सैनिक अफगाणान नागरीकांना मदत करीत असले तरी त्यांना प्रत्येक व्यक्तीला अन्न आणि पाणी मिळणे देखील कठीण झालं आहे.

काबूल विमानतळावर एका पाण्याच्या बाटलीसाठी ४० डॉलर म्हणजे जवळपास ३  हजार रूपये मोजावे लागत आहे. तर एका जेवणाच्या थाळीसाठी १०० डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार जवळपास ७ हजार ५०० रूपये मोजावे लागत आहेत. तर दुसरीकडे अमेरिकन आणि ब्रिटिश सैनिक या कठीण काळात अफगाणी नागरीकांना मदत करीत आहेत. विमानतळाजवळ तात्पुरती घरे बांधून सैनिक येथील रहिवाश्यांना पाण्याच्या बाटल्या आणि अन्न देत आहेत.