सावे अत्याचार प्रकरणातील आरोपीचे वकीलपत्र स्वीकारणार नाही : रणजित गावडे

0
69

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सावे (ता.शाहूवाडी) येथील तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार करणारा नराधम यशवंत बापू नलवडे (वय.५५) याचे वकीलपत्र स्वीकारणार नाही, असे आश्वासन कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष रणजित गावडे यांनी कोल्हापूर दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला आज (गुरूवार) दिले.

कोल्हापूर दक्षिण राष्ट्रवादीचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह सुनिता कांबळे, तमन्ना शेख, योगेश हातलगे, सुरेंद्र माने, राजेंद्र मोरे, रविंद्र मोरे, प्रतिक कांबळे, राजू मुल्ला या शिष्टमंडळाने नराधम नलवडे यांचे वकीलपत्र घेण्यात येऊ नये, याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे आरोपीस वकील मिळणे हे संवैधानिक असले तरी, मानवी दृष्ट्या व समाजासाठी अत्यंत घातक आहे. तरी बार असोसिएशनच्या कोणत्याही वकिलाने आरोपीच्या बाजूने म्हणणे अथवा युक्तीवाद मांडू नये. हे कृत्य अमानवीय असून कोल्हापूरसारख्या पुरोगामी शहराला व जिल्ह्याला न शोभणारे आहे. यावर रणजित गावडे यांनी आरोपीचे वकीलपत्र कोणीही स्वीकारणार नसल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.