इचलकरंजी (प्रतिनिधी) : प्रसूतीपूर्वी गर्भलिंग चाचणी करणाऱ्या डॉ. भाऊसाहेब काटकर यांच्यावर कडक कारवाई करावी. तसेच त्यांचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये. यासाठी इचलकरंजीतील महिला आघाडीने  बार असोसिएशन आणि प्रांताधिकाऱ्यांना आज (गुरुवार) निवेदन दिले.  

निवेदनात म्हटले आहे की, डॉ. काटकर यांना सन २००९ साली याच कारणास्तव अटक झाली होती. तरीही त्यांनी हे काम सुरु ठेवले.  गर्भनिदान करणे हा स्त्री जातीचा आवमान आहे. असे निदान करून अनेक मुलींचा बळी घेतला जातो. या प्रकरणी दोषी असणाऱ्या डॉ. काटकर दांपत्यावर कडक कारवाई करून हॉस्पिटलचा परवाना रद्द करावा. नाहीतर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू असा इशारा शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका मंगल चव्हाण,  नगरसेविका आणि पक्षप्रतोद उमाताई गौड यांनी दिला.

यावेळी मंगल मुसळे,  शोभा कोलब, मंगल लायकर, मधुमती खराडे, सुवर्णा धनवडे, मालती कोपडे, माधुरी टाकारे, हसीना शेडबाळे, पदाधिकारी उपस्थित होत्या.