कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूरातील विविध सामाजिक क्षेत्रात कृतिशील पद्धतीने प्रबोधनाचे भरीव काम करणाऱ्या धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टला  कायदेतज्ञ अॅड. प्रकाश मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन लाखांच्या मदतीचा धनादेश आज  धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा प्रा. करुणा मिणचेकर, ट्रस्टी डॉ. दयानंद ठाणेकर, ज्येष्ठ कामगार नेते सुरेश केसरकर यांच्याकडे सुपूर्द केला.

धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टने गेली पाच-सहा वर्ष सामाजिक प्रबोधनाच्या क्षेत्रांमध्ये भरीव असे काम केले आहे. विविध महामानवांचे विचार लोकापर्यंत तटस्थपणे पोहोचविण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे. त्याचबरोबर विविध विषयांवरील व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्र आणि साहित्य संमेलन आधीचेही आयोजन करणे व समाजात सामाजिक बांधिलकी मानून कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करणे तसेच नैसर्गिक आपत्कालीन संकटकाळी विविध स्तरातील गरजूंना मदत करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संस्थेने केले आहे. या कामाची दखल घेऊन व या कामाला गती मिळण्यासाठी आज अँड. प्रकाश मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वरील दोन लाखांची मदत केली आहे.

यावेळी अनिल म्हमाने, अॅड. महादेवराव आडगुळे, अॅड. विजय महाजन, अॅड. बाळासाहेब पाटील, अॅड. सचिन आवळे, अॅड. योगेश पाटील, अँड. अतुल जाधव, अँड. शैलजा चव्हाण, अँड. एस. एम. पाटील (सरकारी वकील), अँड. चिंतामणीकांबळे, अँड. वारणा पोळ आदी उपस्थित होते.