‘आप’च्या कायदेशीर सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी अॅड. किरणसिंह शिलेदार

0
113

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आम आदमी पार्टीच्या कायदेशीर सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी अॅड. किरणसिंह शिलेदार यांची निवड करण्यात आली. आम आदमी पार्टीच्या कायदेशीर सल्लागार मंडळाच्या नियुक्त्या आज (शनिवार)जाहीर करण्यात आल्या. उद्यमनगर येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालयात पार पडलेल्या नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमात ‘आप’चे महानगरपालिका निवडणूक प्रचार प्रमुख व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी निवडीच्या घोषणा केल्या.

सल्लागार मंडळामध्ये सदस्य अॅड. मनोहर बडदारे, अॅड.महादेव पाटील, अॅड. विनायक खांडेकर, अॅड. सरबतशहा फकिर, अॅड.मनीषा सातपुते, अॅड. अनिल शिंदे यांचा समावेश आहे. यावेळी देसाई म्हणाले की, महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कायदेशीर मंडळाच्या नियुक्त्या आमच्यासाठी महत्वाच्या असून, निवडणुकीच्या प्रक्रियेत मंडळाच्या सदस्यांची मदत होणार आहे.

या वेळी जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, युवाध्यक्ष उत्तम पाटील, महिला शहराध्यक्षा अमरजा पाटील, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, आदम शेख, मोईन मोकाशी, पौर्णिमा निंबाळकर, अश्विनी गुरव, गिरीश पाटील, राज कोरगावकर, राकेश गायकवाड आदी उपस्थित होते.