मास्क न घालणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांंवर प्रशासकांकडून कारवाईचा बडगा…

0
11

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना आज (सोमवार) पाच महापालिका कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी मास्क न वापरल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ताबडतोब भरारी पथकाला त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश दिला. त्यानुसार रणजित सणगत, शंकर वाडिया, सजन थनवाल, स्वप्निल माहुलकर, सुखदेव भोसले यांना प्रत्येकी १०० याप्रमाणे ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

प्रशासक डॉ. कादंबरी बलवकडे यांनी सांगितले की, सरकारी अधिकारी अथवा कर्मचारी यांना सर्वसामान्यांप्रमाणेच नियम आहेत. त्यामुळे नागरिकांना न्याय वेगळा व कर्मचाऱ्यांना यामधून सूट दिली जाणार नाही. सर्व शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मास्क वापरणे, सॅनिटायजरचा वापर करणे बंधनकारक असलेचे सांगितले.