पूरस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज : मुश्रीफ

0
13

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : शहराच्या नदीवेस परिसरासह तालुक्यातील पंचवीस गावे महापुराच्या विळख्यात येतात. यंदाची संभाव्य पूर परिस्थितीत हाताळण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती प्रशासन अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. माजी ग्रामविकासमंत्री व आ. हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज येथील शासकीय विश्रामगृहात संभाव्य पूरस्थितीबाबत आढावा बैठक घेतली.

शहरातील चिकनगुनिया आणि डेंग्यूच्या साथीबाबतही आ. मुश्रीफ यांनी आरोग्य विभागासह मुख्याधिकाऱ्यांकडून माहिती घेताना तातडीने प्रतिबंधासाठी उपाययोजण्याची सूचना केली. यावेळी सतीश पाटील, सुरेश कोळकी, वसंतराव यमगेकर, सिद्धार्थ बन्ने, महेश सलवादे, गुंड्या पाटील, हारूण सय्यद आदींनी अनेक सूचना केल्या.

प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार दिनेश पारगे, मुख्याधिकारी स्वरूप खारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, उपजिल्हा रुग्णालयाचे चंद्रकात खोत आदींनी महापूर आणि साथीबाबत केलेल्या नियोजनाची माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह पाटबंधारे, आरोग्य, महसूल आदी खात्याचे विविध अधिकारी उपस्थित होते.