मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील सर्व सरकारी वाहने इलेक्ट्रिक करण्यात येणार आहेत. पेट्रोल- डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी हा मोठा निर्णय पर्यावरण मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे.  या निर्णयाची अंमलबजावणी  १ जानेवारीपासून  करण्यात येणार असल्याची माहिती  राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटद्वारे केली  आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले आहेत. पर्यावरण प्रदुषणविरहीत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

इलेक्ट्रिक वाहने नागरिकांनी वापरावीत, या करिता नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने १ एप्रिल २०२२ ऐवजी १ जानेवारी २०२२ पासून सरकारी किंवा नागरी स्थानिक संस्था तसेच कॉर्पोरेशनसाठी फक्त इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा किंवा भाड्याने घेण्याचा निर्णय लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी  सांगितले.