मुंबई (प्रतिनिधी) : कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तर न्यायालयाने उद्धव ठाकरे सरकारला फटकारले आहे. यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

‘आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या सविस्तर आदेशाची वाट पाहत आहोत. न्यायालयाने स्थगिती दिली आहे, हे खरं आहे.’ अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

यावर निशाणा साधत किरीट सोमय्या म्हणाले, ‘ठाकरे सरकारला मेट्रो कारशेडची अनधिकृत ऑर्डर मागे घ्यावी लागली. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करण्यापेक्षा न्यायालयात बोलायचं होतं. ते बालिश आहेत.’ तसेच ठाकरे सरकारने जनतेची माफी मागावी, अशी देखील मागणी किरीट सोमाय्या यांनी केली आहे.