आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण…

0
184

मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: आदित्य ठाकरे यांनी आज (शनिवार) सायंकाळी ट्वीट करून याबाबतची माहिती दिलीय.

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. त्याचप्रमाणे सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही ठाकरे यांनी केले आहे. ठाकरे हे दोन दिवसांपूर्वी खाजगी दौऱ्यावर गेले होते. तेथून मुंबईत परतल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबरोबर त्यांनी बैठकीत सहभाग घेतला होता. त्यामुळेच त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाबाबतची चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.