पदवीधर, शिक्षक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात चोख पोलीस बंदोबस्त..

0
100

कोल्हापूर (प्रतिनिधी) : उद्या होणाऱ्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.१ डिसेंबर २०२० रोजी पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार आहे.

ही निवडणूक सुरळीत पार पडावी, तसेच या निवडणुकीमध्ये कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील २८१ मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामध्ये १ पोलीस अधीक्षक, २ अप्पर पोलीस अधीक्षक, ५ पोलीस उपाअधीक्षक,१८ पोलीस निरीक्षक, ४२ सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच पोलीस उपनिरीक्षक, ६०५ पोलीस कर्मचारी, ३ आरसीपी प्लाटून आणि ४ क्यू आर टी  प्लाटून असा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.