फेथ फाऊंडेशनला आदर्श संस्था कार्यगौरव पुरस्कार

0
34

कोल्हापूर : येथील फेथ फाऊंडेशन या संस्थेला इचलकरंजी येथील ए. जे. सोशल फाऊंडेशन (महाराष्ट्र) यांच्या वतीने आजावर केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत आदर्श संस्था कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

इचलकरंजी येथील भाऊसो आरगे सभागृह येथे मराठी सिनेअभिनेते संदीप पाठक यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. कोल्हापुरातील सामाजिक क्षेत्रात सन 2010 पासून कार्यरत असलेल्या फेथ फाऊंडेशन या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात तरुण एन.जी.ओ असलेल्या फेथ फाऊंडेशनच्या माध्यमातून संस्थापक राज कोरगावकर आणि त्यांचे सहकारी गेले अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहेत.

गरजू व्यक्तींना मदत, महापुराच्या काळात लोकांना पाण्यातून बाहेर काढणे, त्यांना अन्नधान्याची सोय करणे, कोविडच्या काळात देखील लोकांना मास्क आणि सॅनिटायझर्स वाटप, महिला सबलीकरणासाठी वेगवेगळ्या पथनाट्याच्या माध्यमातून राबवलेले उपक्रम, आपण सारे भारतीय एक आहोत ही भावना समाजामध्ये रूढ व्हावी यासाठी गेली अनेक वर्ष होत असलेल्या प्रबोधनात्मक रॅली, अन्य समाजोपयोगी उपक्रमांसाठी आदर्श संस्था कार्यगौरव पुरस्काराने फेथ फाऊंडेशनला सन्मानित करण्यात आले.

संस्थेच्या वतीने सदस्य निखिल पोतदार, स्वरूप बेलवलकर, सौरभ कुलकर्णी आदींनी पुरस्कार स्वीकारला. ए. जे. फाऊंडेशनच्या संस्थापिका अबोली जिगजीनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या इचलकरंजी तसेच राज्यात सर्वत्र सुरू असलेल्या कामाबद्दल फेथच्या वतीने सदस्यांनी अभिनंदन केले.