अभिनेत्री रकुल प्रीत सिंगला फोटो पोझ लागली महागात…

0
75

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या बॉलिवूडच्या अभिनेत्रींना त्यांनी परिधान केलेल्या ड्रेसवर ट्रोल केले जाते. असाच किस्सा बॉलिवूड आणि टॉलिवूडची अभिनेत्री रकुल प्रीत सिंगच्या बाबतीत घडला आहे. तिला स्टायलीश होणं अडचणीचं ठरलं आहे.  

रकुल प्रीत सिंग ही महानायक अमिताभ बच्चन आणि अजय देवगण यांच्यासोबत एका चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. रकुल या सिनेमाबद्दल खूप उत्सुक आहे, हे तिनं याआधीच सोशल मीडियावर सांगितलं आहे. परंतु, रकुल या ड्रेसमुळे ट्रोल झली आहे. नुकतेच तिने लेमन यलो कलरचा ड्रेस आणि डेनिम जॅकेट परिधान केले होते.

मात्र, फोटोग्राफर्सला पोज देण्यासाठी रकुल उभी राहाताच तिचा ड्रेस हवेनं उडू लागला. अभिनेत्रीनं आपल्या हातानं ड्रेस पकडत कसंतरी परिस्थिती सांभाळून नेली, तोपर्यंत हे सगळं कॅमेऱ्यामध्ये कैद झाले होते.