मुंबई (प्रतिनिधी) :  अभिनेत्री पूनम पांडेने पतीविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली आहे. वांद्रे पोलिसांनी अभिनेत्रीच्या पतीला अटक केली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. पूनम पांडेने मारहाण केल्याची तक्रार केली आणि यानंतर लगेच याच्या विरोधात कारवाई करण्यात आली. पूनमला रुग्णालयात दाखलं केले असून तिच्या डोक्याला, डोळ्यांना आणि चेहऱ्याला जखमा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गेल्यावर्षी सप्टेंबरमध्येही बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडेने गोव्यात तिच्या पतीविरोधात एफआयआर दाखल केली होती. या लग्नाआधी ते जवळपास दोन वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. गेल्या वर्षी पूनमने बॉयफ्रेंड सॅमसोबत लग्न केलं. गेल्यावर्षी पूनमने सॅमच्या विरोधात छेडछाड, धमकी  आणि मारहाण केल्याचा आरोप केला होता.

या आरोपांनंतर सॅमला गोवा पोलिसांनी अटक देखील करुन त्याला जामिनावर सोडण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा एकदा पूनम पांडेच्या एफआयआरवर सॅम बॉम्बेला अटक केलं आहे.