पुणे (प्रतिनिधी) : गाडी खाडीत कोसळून  पुण्यातील अभिनेत्री ईश्वरी देशपांडे आणि तिचा मित्र शुभम देगडे यांचा मृत्यू झाला.  हा अपघात  सोमवारी  पहाटे  गोव्यातील बागा-कलंगुट येथे घडला.

सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास बागा येथील अरुंद रस्त्यावरुन जात असताना शुभमचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी खाडीत जाऊन कोसळली. दरम्यान गाडी लॉक झाल्यामुळे नाकातोंडात पाणी गेल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला.  सकाळी ७ वाजता अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या दोघांना गाडीमधून बाहेर काढले.

ईश्वरीने मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. काही दिवसांपूर्वी तिने मालिकांचे चित्रीकरण पूर्ण केले होते. ईश्वरी आणि शुभम हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. पुढच्या महिन्यात ते साखरपुडा करणार असल्याचे सांगितले जात आहे.