पॉर्न व्हिडिओ तयार केल्याप्रकरणी अभिनेत्रीला अटक

0
304

मुंबई (प्रतिनिधी) : वेबसीरिजच्या नावाखाली पॉर्नोग्राफिक व्हिडिओ शुट करून वेबसाईटवर अपलोड केल्याप्रकरणी अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे स्वतः प्रोडक्शन हाऊस तयार करून ८५ पॉर्न व्हिडिओ तयार करून साईटवर अपलोड केले जात होते.

मुंबई पोलिसांना पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती. याठिकाणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती. या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या. गहना वशिष्ठचे स्वतःचं प्रोडक्शन हाऊस असल्याचेही समोर आले आहे. गहना वेब सीरिज, शॉर्ट फिल्मच्या नावाखाली पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करून ते वेबसाईटवर अपलोड करायची, असा तिच्यावर आरोप आहे.