स्वत:च्या लग्नाला जाताना अभिनेता वरुण धवनच्या गाडीला अपघात

0
139

मुंबई (प्रतिनिधी) : स्वत:च्या लग्नासाठी जुहूवरुन अलिबागला जात असताना बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या गाडीला शनिवारी अपघात झाला. घाई गडबडीत जात असताना त्याच्या गाडीला अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने यात वरुणला कोणतीही दुखापत झालेली नाही. परंतु, लग्नाला जाण्यापूर्वीच हा अपघात झाल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे.  

वरुण धवनचे आज (रविवार) त्याची प्रेयसी नताशा दलालसोबत लग्न होणार आहे. लग्नाच्या तयारीसाठी वरुण आणि नताशाच्या घरातील मंडळी शुक्रवारीच अलिबागला गेले आहेत. वरुण शनिवारी त्याच्या कारने अलिबागच्या दिशेने रवाना झाला होता. याचवेळी वाहतूक कोंडीत सापडलेल्या वरुणच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात गाडीचे किरकोळ नुकसान झाले आहे.