अभिनेता सोनू सूदने घेतली शरद पवारांची भेट

0
67

मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेता सोनू सूद यांने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांची त्यांच्या निवासस्थानी आज (बुधवार) भेट घेतली. यावेळी त्यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप कळू शकलेले नाही. मुंबई महापालिकेने बेकायदा बांधकाम केल्याचा आरोप सूदवर केला आहे. याबाबतच सूदने पवारांशी चर्चा केल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, महापालिकेच्या कारवाईविरोधात सोनू सूदने उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. आपण कोणत्याही प्रकारचे बेकायदा बांधकाम केले नसल्याचा दावा त्याने केला आहे. तर बेकायदा बांधकामाप्रकरणी वारंवार नोटीस बजावून आणि कारवाई करूनही सोनू सूदने कायद्याचे उल्लंघन करणे थांबवले नाही. त्यामुळे तो वारंवार कायदे मोडणारा गुन्हेगारच आहे, असा दावा करून त्याला कारवाईपासून कोणताही दिलासा देऊ नये, अशी मागणी महापालिकेने मंगळवारी उच्च न्यायालयात केली आहे.