अभिनेते राजीव कपूर यांचे निधन

0
88

मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेते राजीव कपूर यांचे आज (मंगळवार) हृदयविकाराच्या  झटक्याने निधन झाले . ते ५८ वर्षांचे होते. अभिनेत्री नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे.

मी माझा धाकटा भाऊ आज गमावला आहे. आता तो या जगात नाही. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, त्याचे प्राण वाचवता आले नाहीत. मी आता रुग्णालयात आहे आणि त्याचं शव मिळण्याची वाट पाहतोय, अशी पोस्ट रणधीर कपूर यांनी केली आहे. राजीव कपूर हे दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांचा धाकटा भाऊ होत. ‘राम तेरी गंगा मैली’ हा त्यांचा चित्रपट गाजला होता.