नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुपरस्टार रजनीकांत यांना ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपटसृष्टीतील मानाचा पुरस्कार मानला जातो.

सुपरस्टार रजनीकांत यांना ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. तसेच हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेत्री कंगना रनौतला ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’ या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर दाक्षिणात्य अभिनेता धनुषला ‘असुरन’ या चित्रपटासाठी सर्वोकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. अभिनेता मनोज वाजपेयी यांना ‘भोसले’ या चित्रपटासाठी सर्वोकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

तर अक्षय कुमारच्या ‘केसरी’ चित्रपटातील ‘तेरी मिट्टी’ या गाण्यासाठी बी प्राक यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच मराठीतील ‘रान पेटले’ या गाण्यासाठी सावनी रवींद्रला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले.