चेन्नई (वृत्तसंस्था) : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता महेश बाबू यांचा मोठा भाऊ अभिनेता आणि निर्माते रमेश बाबू  ( वय ५६) यांचे  दीर्घ  आजाराने शनिवारी रात्री निधन झाले.  चित्रपट निर्माते बीए राजू यांनी ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे.

रमेश बाबू यांना यकृताचा आजार होता.  त्यांच्यावर अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांनी अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या असून काही चित्रपटांची निर्मितीही  केली आहे. दरम्यान,  भावाच्या निधनामुळे महेश बाबू यांना मोठा धक्का बसला आहे. महेश बाबू यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते आयसोलेशनमध्ये आहेत.