अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा भाजपमध्ये प्रवेश

0
176

कोलकाता (वृत्तसंस्था) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोलकाता येथील ऐतिहासिक ब्रिगेड परेड मैदानावर पंतप्रधान मोदी यांची आज (रविवार) मोठी रॅली आयोजित केली होती. यावेळी अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मिथुन चक्रवर्ती यांचे भाजपमध्ये प्रदेश भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष, प्रदेश प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी स्वागत केले. 

काळा चष्मा आणि काळी टोपी घातलेल्या मिथुनदा यांचे व्यासपीठावर आगमन होताच लोकांनी जल्लोष केला. कैलास विजयवर्गीय यांनी त्यांच्या पक्ष प्रवेशाची औपचारिकता पूर्ण केली. दरम्यान, बंगालचे भाजप प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी बेलागाछिया येथील मिथुन चक्रवर्ती यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. या भेटीनंतर केलेल्या  ट्विटमध्ये विजयवर्गीय यांनी म्हटले आहे की, शनिवारी रात्री बेलागाछिया येथील दिग्गज अभिनेते मिथुनदा यांच्याशी आम्ही दीर्घकाळ चर्चा केली. त्यांच्या देशप्रेमाच्या आणि गरिबांवरील प्रेमाच्या कथा ऐकून माझे मन भरून आले आहे.