कोल्हापूर (प्रतिनिधी) : शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आविक कॉम्प्लेक्स येथील फ्लॅटमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी  एजंट ज्योती सुनिल पोवार (रा. पुलाची शिरोली) या महिलेला अटक करण्यात आली आहे. तर तिच्याकडील ८ हजार ५०१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर  ४ पीडित महिलांची सुटका करण्यात आली. 

शाहूपुरी परिसरात आविक कॉम्प्लेक्स येथे एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये एजंट ज्योती पवार ही मसाज पार्लरच्या नावाखाली बेकायदेशीररित्या महिला आणून वेश्याव्यवसाय चालवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या मदतीने येथे छापा टाकून कारवाई केली.

सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, सहा. पोलीस निरीक्षक श्रद्धा आबंले (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड काँस्टेबल  आनंदा पाटील,  रवींद्र गायकवाड, सायली कुलकर्णी,  मिनाक्षी पाटील, पोलीस नाईक अभिजित घाटगे, तृप्ती सोरटे यांनी केली.