कोल्हापूर (प्रतिनिधी) : लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे, ते कोल्हापूरकर भरणार नाही, याबाबत जनजागृती करण्यासाठी ७ जानेवारीला साडेनऊ वाजता गांधी मैदानातून दुचाकी, चारचाकी, तीन चाकी, ट्रक, टेंम्पो, लक्झरीसह फेरी काढणार आहोत. ही फेरी काढण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी द्यावी, अशी मागणी ‘आम्ही वीज बिल भरणार नाही कृती समिती’ने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचेकडे आज (बुधवार) निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारी नियं!णात आणण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. या काळात अनेकांचे व्यवसाय, नोकऱ्या गेल्या. सर्वसामान्य गरीब कुटुंबांची वाताहात झाली. यामुळे लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे, अशी सर्वच थरातून मागणी होत आहे. यासंबंधी अर्ज, निवेदन विविध शिष्टमंडळाव्दारे वीज अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. सरकारकडेही पाठपुरावा सुरू आहे. पण अजून निर्णय झालेला नाही. म्हणून वीज बिल भरणार नाही, यासंबंधीच्या जनजागृतीसाठी फेरी काढण्यात येणार आहे. त्यास मंजुरी द्यावी.

यावेळी सुभाष जाधव, विक्रांत पाटील, बाबा पार्टे,  जयकुमार शिंदे आदी उपस्थित होते.