तारदाळ-खोतवाडी रस्त्यावर मास्क न व वापरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईचा बडगा…

0
56

शिरोळ (प्रतिनिधी) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मास्क न वापरणाऱ्या बेजबाबदार वाहनधारकांवर खोतवाडी ग्रामपंचायत व शहापूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. आज (शनिवार) तारदाळ-खोतवाडी रस्त्यावर बेशिस्त वाहनधारकांना प्रत्येकी २०० रुपयांचा दंड करण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे नागरिकांकडून व्यवस्थित पालन केले जात नाही. त्या पार्श्वभूमीवर खोतवाडी ग्रामपंचायत व शहापूर पोलीस ठाण्यामार्फत संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली. मास्क न वापरणाऱ्या वाहनधारकांना २०० रु. दंड आकारण्यात येत होता. यावेळी वाहनधारक व पोलीस यांच्यामध्ये वादाचे प्रसंग उद्भवले, मात्र कारवाई कठोरपणे राबविण्यात आली.