वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३२१ जणांवर कारवाई…

0
127

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहर वाहतूक शाखेने वाहतुकी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३२१ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. येथून पुढेही कारवाईची ही मोहीम तीव्र करणार असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेच्या नूतन पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी दिली.

शहर वाहतूक शाखेच्या वतीने वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर बुधवारपासून मोहीम सुरू करण्यात आली आहे. नियमबाह्य नंबर प्लेट लावणाऱ्या १७८  जणांवर, कर्कश्य हॉर्न लावून फिरणाऱ्या ६६ जणांवर तर ट्रिपल सीट फिरणाऱ्या ७७ जणांवर अशा एकूण ३२१ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.