हेळेवाडी घरफोडी प्रकरणातील आरोपीला अटक : ९० हजारांचा मुद्देमाल जप्त

0
49

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील हेळेवाडी येथील हरीराम मारूती येरूडकर यांच्या घरात १ लाखाची चोरी झाली होती. या आरोपीला अटक करण्यास भुदरगड पोलीसांना यश मिळाले आहे. या प्रकरणी शरद साताप्पा येरूडकर (वय ३५, रा. हसूर खुर्द, ता. कागल) याच्याकडून ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यावेळी आरोपीकडून २१ हजारांची रोख रक्कम, ४० हजारांचे सोन्याचे गंठण,१५ हजारांची सोन्याची अंगठी, ४ हजारांची सोन्याची अंगठी, चांदीची बिंदली, चार नग पायातील जोडवी, १० हजारांच्या दोन बुगड्या असा सुमारे ९० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई भुदरगड पोलीस ठाण्याचे निरिक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. सतीश मयेकर,अमित देशमुख, तपास अंमलदार संदेश कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल किरण पाटील, जयवंत ढोकरे यांनी केली.