मुंबई (प्रतिनिधी) :  राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (रविवार) जाहीर केले. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग असणार आहेत.

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार अशी खाती देण्यात आली आहेत.

तसेच इतर १८ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे…

राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, सुधीर मुनगंटीवार- वन, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय, चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य, डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास, गिरीष महाजन- ग्रामविकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, गुलाबराव पाटील-पाणीपुरवठा व स्वच्छता, दादा भुसे – बंदरे व खनिकर्म, संजय राठोड -अन्न व औषध प्रशासन, सुरेश खाडे- कामगार, संदीपान भुमरे –  रोजगार हमी योजना व फलोत्पादन अशी आहेत.

तर उदय सामंत – उद्योग, प्रा. तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, रवींद्र  चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व  नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अब्दुल सत्तार – कृषी, दिपक केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा, अतुल सावे – सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण, शंभूराजे देसाई – राज्य उत्पादन शुल्क, मंगलप्रभात लोढा – पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास अशा खात्यांचे वाटप करण्यात आले आहे.