शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू…

0
42

मुंबई (प्रतिनिधी) :  शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे आज (रविवार) सकाळी झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. सकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. यामध्ये विनायक मेटे गंभीर जखमी झाले होते. हा अपघात मुंबई-पुणे एक्सप्रेस वे-वर घडला.

या गंभीर अपघातानंतर विनायक मेटेंना पनवेलच्या एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक मेटे यांचं अपघातस्थळीच निधन झालं होतं. याशिवाय त्यांच्या डोक्याला आणि छातीला मार लागला होता.

तर मिळालेल्या माहितीनुसार, मेटे यांच्या गाडीने अनोळखी वाहनाने धडक दिली आहे. या भीषण अपघातात विनायक मेटेंचा सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली असून त्याच्यावर पनवेलच्या एमजीएम रूग्णालयात उपचार सुरु आहेत.