पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू…

0
788

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पाटबंधारे विभागातील कालवा निरीक्षक राहूल अनिल पाटील (वय ३५, रा. शिरोली पुलाची, कोल्हापूर) यांचा आज (शुक्रवार) अपघाती मृत्यू झाला. कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावर रेडे डोह येथे मारूती कार आणि मालवाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाली. या धडकेत कारमधील राहूल पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, राहूल पाटील हे कार्यालयीन कामासाठी आपल्या मारूती कार क्र. (एमएच ०१ डीए ८९८२) मधून पन्हाळ्याकडे जात होते. यावेळी समोरून आलेल्या या मालवाहतूक करणाऱ्या ट्रकची  समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात राहूल यांचा जागीच मृत्यू झाला.