पुणे-बेंगलोर महामार्गावर अपघात : एकाचा मृत्यू

0
65

टोप (प्रतिनिधी) : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या साई सर्व्हीस शोरूमजवळ अज्ञात वहानाच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. गजानन लक्ष्मण उनाळे (वय ४०, रा. शिवाजीनगर, शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) असे त्यांचे नाव आहे. हा अपघात काल (मंगळवार) रात्री उशीरा घडला. याबाबत शिरोली पोलिसात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार स्वरुप उनाळे यांनी पोलिसात दिली आहे.

पोलिसातून दिलेल्या माहितीनुसार, एचएमटी फाटा येथील साई सर्व्हीस शोरूमच्या सेवा रस्त्याने कामावरून पायी घरी चाललेल्या गजानन उनाळे यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रात्री उशीरा झाला. गजानन उनाळे हे शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका खासगी कंपनीत काम करत होते.

औद्योगिक वसाहतीमधील मंगळवार हा कामाचा पहिला आठवडा असल्याने त्यांची ४ ते १२ असल्याने रात्री कामावरून सुट्टी झाल्यानंतर ते पायी चालत घरी निघाले होते. त्याचवेळी कार शोरूमजवळ त्याना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.