आजऱ्याजवळ अपघात : गोकुळच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

0
1660

आजरा (प्रतिनिधी) : आजऱ्याजवळ सोहाळे तिठ्यानजीक सूतगिरणीच्या वळणावर एका अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने आजरा तालुक्यातील देवर्डे येथील गोकुळ दूध संघाचे प्रोडक्शन मॅनजर निलेश मारुती तानवडे (वय २५) हे जागीच ठार झाले. हा अपघात आज (शुक्रवार) दुपारच्या दरम्यान घडला.

घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, निलेश हा आजऱ्याहून कोल्हापूरकडे संघाच्या कामानिमित्त जात होता. त्यावेळी त्याला एका वळणावर अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने निलेश रस्त्यावर पडला त्यानंतर त्या वाहनाचे चाक त्याच्या डोक्यावरून गेले. त्यामुळे निलेशचा जागीच मृत्यू झाला.

निलेश तीन वर्षांपूर्वी गोकुळ दूध संघात नोकरीला लागला होता. याच वर्षी त्याची बदली वाशी नवी मुंबई येथून ताराबाई पार्क येथे झाली होती. निलेश हा त्याच्या कुटुंबात एकमेव कमावता मुलगा होता. त्याच्या निधनाने तानवडे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या अपघाताची नोंद आजरा पोलिसात झाली आहे.